Volume 07, Issue 04
Frequency: 12 Issue per year
Paper Submission: Throughout the Month
Acceptance Notification: Within 2 days
Areas Covered: Multidisciplinary
Accepted Language: Multiple Languages
Journal Type: Online (e-Journal)
ISSN Number:
2582-8568
बाल या संज्ञेत शिशू, किशोर आणि कुमार या बालपणातील बदलांचा समावेश होतो. जे मानवी जीवनातील एक स्वतंत्र दालन आहे. लहान मुल प्राथमिक स्तरावर पंचेद्रियांद्वारे ज्ञान ग्रहण करते. त्याच्या बालविश्वाचा जवळचा स्नेहबिंदू आई असते. लहानपणी आजी, आजोबा, बाबा इत्यादी नात्यांची भावनिक पदरे त्याच्या व्यक्तिमत्वाला आकार देतात. भाषाविकास, संस्कृती, आचार, विचार, मूल्यात्मक शिकवणीमुळे बालकाच्या व्यक्तिमूल्याला सुआकार प्राप्त होतो. सभोवतालचा परिसर, निसर्ग, पशु, पक्षी, प्राणी या नौसर्गिक गोष्टीमुळे बालकाचे मनोविश्व रुंदावते. देह, मन इंद्रिय, मेंदू आणि ह्रदय यांची निसर्गदत्त येणारी समज हळूहळू यामुळे बालकात उत्क्रांत होत जाते. निरीक्षण, अनुकरण, अनुसरण आणि अनुकृतीतून प्रत्यक्ष कार्याचा अनुभव घेण्याची विविध कौशल्ये बालवयात सहजपणे जोपासली जातात. यामुळे बालकाचे अनुभव विश्व हळूहळू विकसित होत जाते.