Paper Details

Call For Papers

Volume 07, Issue 06
Frequency: 12 Issue per year

Paper Submission: Throughout the Month
Acceptance Notification: Within 2 days
Areas Covered: Multidisciplinary
Accepted Language: Multiple Languages
Journal Type: Online (e-Journal)

Sample Certificate
Announcement
Publish books with ISBN Number
  1. Edited Book
  2. Text Book
  3. Ph.D Thesis
  4. Conference Proceedings

ISSN Number:
2582-8568


Journal DOI No:
03.2021-11278686

Title:
Linguistic special of the Autobiography 'Tandel' by the talented Poet Raoji Rathod

Authors:
Dr. Ramesh Atmaram Jadhav

Cite this Article:
Dr. Ramesh Atmaram Jadhav ,
Linguistic special of the Autobiography 'Tandel' by the talented Poet Raoji Rathod,
International Research Journal of Humanities and Interdisciplinary Studies (www.irjhis.com), ISSN : 2582-8568, Volume: 07, Issue: 06, Year: June 2026, Page No : 154-166,
Available at : http://irjhis.com/paper/Dummy Paper.pdf

Abstract:

पृथ्वीच्या पोटात ऊर्जा दाटली की धरणीकंप होतो आणि ऊर्जा अंगार होऊन ज्वालामुखीच्या रुपाने बाहेर पडते. असे लाव्हारस ओकणारे लेखन राठोड यांच्या हातून झालेले आहे. रावजी राठोड म्हणतात, "मनाचं रंजन करण्यासाठी शब्द रंगविणे म्हणजे ते लेखन बेगडी होणार. बेगड पोळ्यापुरते बैल सजवण्यासाठी बरे वाटतात. रोजच्या जगण्याचे वास्तव वेगळे असते. हे वेगळे सत्य साहित्यात उतरणं नितांत आवश्यक आहे. प्रसिध्दीसाठी पोपटपंची करण्यापेक्षा शब्दांसाठी जगणं व बांधील असणं महत्त्वाचं असतं." या भूमिकेतूनच त्यांनी लेखन केले आहे. प्रस्तुत स्वकथनाच्या भाषिक विशेषांवर आपण भाष्य करणार आहोत, 'तांडेल'ची पहिली आवृत्ती 1999 मध्ये प्रसिध्द झाली आहे. खरे तर 'तांडेल'चे लेखन १९८३ मध्येच पूर्ण झाले होते. प्रकाशनापूर्वीच गाजणारे हे मराठीतील पहिले स्वकथन, प्रकाशनाआधीच वेगवेगळ्या कार्यक्रमातून 'तांडेल' वर त्यावेळी खूप चर्चा झाली होती. शिवाय शरणकुमार लिंबाळे, श्रध्दा बेलसरे, बा. ह. कल्याणकर, लक्ष्मण माने यांनी 'तांडेल'ची काही प्रकरणे आपल्या नियतकालिकातून प्रसिध्द सुद्धा केली होती. लोकमत, सकाळ, तरुणभारत या लोकप्रिय दैनिकांच्या रविवार पुरवणीतूनही तांडेलची काही प्रकरणे त्यावेळी प्रकाशित झालेली आहेत. प्रा. रावजी राठोड यांचे सहकारिमित्र प्रा. दत्ता भगत यांनी प्रकाशनापूर्वीच तांडेल विषयी म्हटले होते, "प्रा. रावजी राठोड यांनी गावशिवेवरचं रानमाळावरील लोकजीवनाच्या वैचित्र्य व वेगळेपणाने मराठी साहित्यात फार मोठी मोलाची भर तर पडणार आहे. पण मराठवाड्यात, संपूर्ण महाराष्ट्रभर गाजणारं जे पुस्तक आलं ते प्र.ई.चं त्यानंतर हे दुसरं स्वकथन म्हटलं पाहिजे." भाषिक विशेषाने समृद्ध असणारे, सामाजिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक दस्तावेज असलेले, लोकसाहित्याच्या अभ्यासकांना संदर्भग्रंथ म्हणून उपयोगी पडणारे ‘तांडेल’ हे एकमेव अद्वितीय असे स्वकथन आहे. अशा या स्वकथनाचे भाषिक सौदर्यं खूपच लक्षवेधक आणि उत्तम आहे. या कथनाच्या भाषिक विशेषासंदर्भात डॉ. रमेश जाधव लिहितात, “तांडेल नांदेडच्या परिसरात बोलली जाणारी ग्रामीण मराठी बोली व गोरबोली यांच्या संयोगातून तयार झालेल्या मराठी बोलीतून आकारास आलेला आहे. संवाद व निवेदनासाठी बोलीभाषेचा कटाक्षाने व जाणीवपूर्वक वापर केलेला जाणवतो. कारण भाषा हे क्रांतीचे पडघम असून, आपल्या संस्कृतीची ओळखसुद्धा भाषेमुळेच होते ही जाण लेखकाला असल्यामुळे जाणीवपूर्वक गोरमाटी शब्द व बोली त्यांनी अभिव्यक्तीचे साधन म्हणून वापरले आहे.



Keywords:

Tandel



Publication Details:
Published Paper ID: IRJHIS2606017
Registration ID: 22425
Published In: Volume: 07, Issue: 06, Year: June 2026
Page No: 154-166
ISSN Number: 2582-8568

Download Full Paper: Click Here

Article Preview:

ISSN Number

ISSN 2582-8568

Impact Factor

5.828 (2022)

DOI Member


03.2021-11278686